निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

दिनेश पवार:दौंड:

भारत निवडणूक आयोगाने दि.25 जानेवारी ते दि.15 मार्च 2022 या कालावधीत राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन केले आहे,12 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य या विषयावर राष्ट्रीय मतदार जागरूकता स्पर्धा सुरू केली आहे,.

ही स्पर्धा पाच विषयावर होणार असून यामध्ये प्रश्नमंजुषा,व्हिडीओ चित्रण,भित्तिचित्रे, गायन,घोषवाक्य आशा पाच प्रकारात ही स्पर्धा होणार असून सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात,या स्पर्धांची सविस्तर माहिती https://ecisveep.nic.in/contest हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे तरी सर्वांनी याची सविस्तर माहिती घ्यावी,सर्जनशील अभिव्यक्ती द्वारे देशातील प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देणे हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचे दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले तसेच या स्पर्धेत दौंड तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा,महाविद्यालय इतर संस्था तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे मत दौंड नायब तहसिलदार प्रविणा बोर्डे यांनी व्यक्त केले

Previous articleनारायणगाव येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात
Next articleखासदार डॉ. कोल्हे यांच्या संकल्पनेतील ‘इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाची भर टाकणारा – अजितदादा पवार