मांजरी खुर्द गावच्या सरपंचपदी निखिल उंद्रे

गणेश सातव,वाघोली

पूर्व हवेलीतील मांजरी खुर्द गावच्या सरपंचपदी युवा सदस्य निखिल उत्तम उंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विद्यमान सरपंच व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण सदस्य स्वप्निल दत्तात्रय उंद्रे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.त्यानुसार सरपंच पदासाठी निवडणुक जाहीर झाली होती.आज मांजरी खुर्द ग्रामपंचायत सभागृहात हि निवडणुक पार पडत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विधीत कालावधीत निखिल उंद्रे यांचा एकमेवचं अर्ज आल्याने त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी, मंडलाधिकारी सत्यवान लांडगे यांनी जाहीर केले.सरपंचपदी निवड होऊन विराजमान होताचं मावळते सरपंच स्वप्निल उंद्रे यांच्या हस्ते निखिल उंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप,भाजपा प्रदेश कार्यकरणी सदस्य रोहिदासशेठ उंद्रे,माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे यांच्या हस्ते हि उंद्रे यांचा सन्मान करण्यात आला.

निवडणुक निर्णय अधिकारी सत्यवान लांडगे यांच्या सोबत सहाय्यक अधिकारी म्हणुन तलाठी संदीप शिंदे व ग्रामसेविका एस.आर.भुजबळ यांनी काम पाहिले.या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित सरपंच निखिल उंद्रे म्हणाले, ग्रामपंचायत मांजरी खुर्दच्या माझ्या सर्व सहकारी सदस्यांना, गावातील जेष्ठ मार्गदर्शक व ग्रामस्थांना विचारात घेऊन गावचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. गावातील रस्ते, ड्रेनेज इ. मुलभूत विकासकामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यावर भर देणार आहे.

नवनिर्वाचित सरपंच निखिल उंद्रे यांची गावातुन ढोललेझीम इतर सवाद्यात, भंडाऱ्याची मुक्त उधळण करत मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी श्री.छत्रपती शिवाजीमहाराज, ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ व हनुमान महाराज यांना पुष्पहार अर्पण करून गावातील चौकात विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनेक जेष्ठांनी मार्गदर्शन केले.

माजी सरपंच स्वप्निल उंद्रे,उपसरपंच वैशाली काकडे,सदस्य सिताराम उंद्रे, महादेव उंद्रे,प्रतिक भोसले, प्रतिमा उंद्रे,वर्षा उंद्रे, रेखा पवार,पुष्पलता सावंत,किर्ती दौंडकर, मनिषा ढेरे,जयश्री हंकारे, मा.उपसरपंच किशोर उंद्रे, महानगर बॅंकेचे संचालक विकास उंद्रे,मा.उपसरपंच प्रकाश सावंत, मा.सरपंच विलासआबा उंद्रे, पै.बाळासाहेब भोसले,हनुमंत उंद्रे, पोलीस पाटील अंकुश उंद्रे, कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलींद कुंजीर,मा.सरपंच शांताराम उंद्रे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश उंद्रे.इत्यादी मान्यवर आजी माजी सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ, महिलाभगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस निरिक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous articleनारायणगाव ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीला आबालवृद्ध ,महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण – वर्षा गायकवाड