नारायणगाव ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीला आबालवृद्ध ,महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नारायणगाव (किरण वाजगे)

बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या नारायणगाव ते शिवनेरी सायकल रॅलीची…
नारायणगाव ते किल्ले शिवनेरी असा सुमारे १६ किलोमीटर लांब अंतराचा सायकल प्रवास अबालवृद्ध, महिला व छोट्या बालकांनी देखील उत्स्फुर्तपणे पार पाडत एक प्रकारे आदर्श घालून दिला आहे.

 

शिवनेरी एथलेटिक्स सोसायटी, शिवजन्मभूमी जुन्नर तालुका यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नारायणगाव ते किल्ले शिवनेरी अशा सायकल रॅली मध्ये अवघ्या सात वर्षाच्या मुक्ता मुकेश वाजगे तसेच अभिराज अमित बेनके, अगस्त्य किरण वाजगे, तनिष्का तुळशीदास कोराळे, कृष्णा स्वप्नील दळवी, स्वराज संदीप दळवी या आठ ते नऊ वर्षाच्या बालकांनी देखील सोळा किलोमीटर चे अंतर लीलया सायकल चालवून पार पाडले.


या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे एका कुटुंबातील आई-वडील व दोन्ही मुलांनी सायकल रॅलीत सहभाग घेतला. तसेच वय वर्ष ०७ ते ७० वर्षे वय असलेल्या सुमारे ४५० सायकलपटूंनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.

मुक्ता मुकेश वाजगे या सात वर्षाच्या चिमुकलीने सायकल रॅली सुरू होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवगर्जना म्हणजेच शिव गारद दिली यामुळे मुक्ता वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


या सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना युवा नेते अमित बेनके व आमदार अतुल बेनके मित्र मंडळाच्या वतीने जुन्नर येथे बक्षिसे, प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात आले.

Previous articleवाघोलीत ‘न्याती इलान’ सोसायटीमध्ये ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा
Next articleमांजरी खुर्द गावच्या सरपंचपदी निखिल उंद्रे