वाघोलीत ‘न्याती इलान’ सोसायटीमध्ये ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा

गणेश सातव,वाघोली

वाघोली येथील न्याती इलान वेस्ट सोसायटी मध्ये शिवजयंती महोत्सव अतिशय शिवमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त महाराजांच्या मूर्तीची स्थापना करुन पुष्पहार अर्पण करुन पूजा करण्यात आली.त्यासाठी परिसरात विविध प्रकारच्या सुवासिक व रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती.सोसायटीच्या सभासदांपैकी काहींनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ आणि महाराणी सईबाई यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.तर लहान मुलांनी पोवाडे सादर करुन सोहळ्याची रंगत वाढवली.

या सोहळ्यासाठी मीना काकी सातव पाटील आणि जयश्रीताई सातव पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली.या कार्यक्रमासाठी योगेश सातव पाटील यांच्या संकल्पनेतून दिल दोस्ती दुनियादारी या ग्रुपच्या सदस्यांनी तीन दिवस अपार मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.आणि दर वर्षी याहीपेक्षा सरस समाजोपयोगी कार्यक्रम राबवला जाईल अशी ग्वाही देण्यात आली.

Previous articleप्रेमाखातर समर्थक कार्यकर्त्याच्या हातून आमदारांनी केले केशकर्तन
Next articleनारायणगाव ते किल्ले शिवनेरी सायकल रॅलीला आबालवृद्ध ,महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद