प्रेमाखातर समर्थक कार्यकर्त्याच्या हातून आमदारांनी केले केशकर्तन

गणेश सातव,वाघोली

पेरणे(ता-हवेली) येथील पेरणे फाटा येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांच्या हस्ते ‘एस.कुमार जेन्टस पार्लरचे’ उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दुकानाचे मालक,आमदार अशोक पवार यांचे लाडके समर्थक दत्ताआबा गायकवाड यांनी आमदार अशोक पवार यांना दाढी कटिंग करण्याचा आग्रह केला.आमदार पवार यांनी देखील कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी केलेली मागणी मान्य करत आपल्या कार्यकर्त्याच्या हातून दाढी कटिंग करून घेतली.यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते हि अचंबित झाले.

आमदारांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताचं आमदार व कार्यकर्त्याच्या या आगळ्यावेगळ्या स्नेहबंधनाची चर्चा परिसरात चांगलीचं रंगली.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर,तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष साईनाथ वाळके पाटील,सरपंच रुपेश ठोंबरे,माजी सरपंच आण्णासाहेब टुले,माजी उपसरपंच निलेश वाळके, बापूसाहेब कदम,शिवाजी वाळके, हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दादासाहेब माने,दादा पाटील वाळके,मधुकर वाळके, नाना सरडे,शांताराम वाळके,काळूराम ठोंबरे,शंकर टुले, साईप्रसाद वाळके,उद्योजक बाळासाहेब कदम, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ता वाळके,वढु खुर्दचे माजी उपसरपंच विलास तात्या खांदवे,बुर्केगावचे माजी सरपंच नितीन बाजारे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन एस एम देशमुख यांच्या हस्ते
Next articleवाघोलीत ‘न्याती इलान’ सोसायटीमध्ये ‘शिवजन्मोत्सव’ उत्साहात साजरा