मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन एस एम देशमुख यांच्या हस्ते

पुणे- मराठी पत्रकार परिषदेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज पुणे येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, परिषद प्रतिनिधी एम जी शेलार, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, समन्वयक सुनील जगताप आदि उपस्थित होते.

परिषदेच्या या दिनदर्शिकेमध्ये परिषदेची महत्वाची माहिती देण्यात आली आहे. शिवाय अनेक पत्रकारांचे वाढदिवस यामध्ये देण्यात आलेले आहेत..परिषदेच्या उपक्रमाची छायाचित्रे. हे या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये आहे. राज्यातील पत्रकारांसाठी ही दिनदर्शिका माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरेल असा विश्वास एस.एम देशमुख यांनी व्यक्त केला.

पुढच्या वर्षी वेळेत अधिक माहितीपूर्ण कॅलेंडर काढण्याचा प्रयत्न केला जाईल असेही एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले. कॅलेंडरसाठी ज्यांनी जाहिराती देऊन सहकार्य केले अशा सर्व तालुका आणि जिल्हा संघाचे तसेच व्यक्तीगत सर्वांचे देशमुख यांनी आभार मानले आहेत. बापुसाहेब गोरे यांनी कँलेंडरचे संपादन केले. परिषदेचे हे कॅलेंडर विक्रीसाठी उपलब्ध असून २० रूपये किंमत आहे. त्यासाठी बापुसाहेब गोरे यांच्याशी संपर्क साधता येईल. सुनील नाना जगताप यांनी प्रास्ताविक केले तर शरद पाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous articleविजय गायकवाड प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleप्रेमाखातर समर्थक कार्यकर्त्याच्या हातून आमदारांनी केले केशकर्तन