छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घ्यावा -प्रतापराव खांडेभराड

चाकण – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पी के फाऊंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पस कडाचीवाडी,चाकण या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पस आवारातील शिवस्मारकाचे पूजन करून उत्सवास सुरुवात झाली. शिवस्मारकाचे पूजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रतापराव खांडेभराड यांच्या हस्ते झाले प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मल्टीनॅशनल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मायकल स्टेअर,नम्रता स्टेअर, संस्थेच्या सेक्रेटरी नंदाताई खांडेभराड, अक्षता खांडेभराड, अंकुशराव नानेकर, दत्ताशेठ खांडेभराड, पत्रकार शरद भोसले व पत्रकार अविनाश दुधवडे तसेच विविध विभागांचे प्राचार्य,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शिवजयंती निमित्ताने पी के टेक्निकल कॅम्पस ने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धा आयोजित केली होती.सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विजेते पुढीलप्रमाणे -डॉ. कैलास साहेबराव दौंडकर – प्रथम क्रमांक, श्री. अक्षय डोंगरे – द्वितीय क्रमांक तर संस्कृती ग्रुप चाकण यांचा तृतीय क्रमांक आला.सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी प्रतापराव खांडेभराड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तरुण पिढीने कोणतीही भीती मनात न बाळगता यश मिळवावे असे प्रतिपादन केले. पी के टेक्निकल कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी विविध मर्दानी खेळ,पोवाडा गायन तसेच नृत्य सादर केली. त्याच बरोबर कॅम्पस मध्ये शिवकालीन युद्धकला साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. चाकण व परिसरातील अनेक विद्यार्थी,युवक, तसेच नागरिकांनी सदर ऐतिहासिक युद्ध साहित्याद्वारे शिवकालीन युद्धकला समजावून घेतली. पी के फाऊंडेशनच्या संस्था प्रतिनिधी कु.निकिताताई खांडेभराड यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा -योगेश पाटे
Next articleपर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या कामाचा घेतला आढावा