आप्पासाहेब डोंबे यांची हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसपदी निवड :- आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसपदी आप्पासाहेब डोंबे यांची निवड करण्यात आली .आप्पासाहेब डोंबे यांना शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रवक्ते विकास लवांडे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा भारती शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा सुरेखा भोरडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नंदुपाटिल काळभोर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, तालुका युवक अध्यक्ष सागर कांचन, संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, ओबीसी अध्यक्ष तालुका सुभाष टिळेकर, सरपंच विठ्ठल शितोळे, शिक्षक सेल जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण काकडे, अर्जुन कांचन, सुभाष बगाडे, तालुका उपाध्यक्ष विजय तुपे, मा.उपसरपंच सागर कांचन, शहर अध्यक्ष रामदास तुपे आदी उपस्थित होते.

आमदार अशोक पवार तसेच खासदार डॉ अमोल कोल्हे, जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, स्थानिक पातळीवरील नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचे काम करणार सर्वांना बरोबर घेऊन असे नुतन तालुका सरचिटणीस आप्पासाहेब डोंबे यांनी सांगितले.

Previous articleशहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील होदीगेरे येथील समाधीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतले दर्शन
Next articleभैरवगडावरून शिवरायांना मानाचा मुजरा : टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भैरवगडावरून शिवप्रतिमेस केलेले वंदन ठरले लक्षवेधी