रामदास तुपे यांची उरुळी कांचन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदी निवड : आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

उरुळी कांचन

उरुळी कांचन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्षपदी रामदास तुपे यांची निवड करण्यात आली शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रवक्ते विकास लवांडे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, जिल्हा महिला अध्यक्षा भारती शेवाळे, तालुका महिला अध्यक्षा सुरेखा भोरडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जिल्हा उपाध्यक्ष नंदुपाटिल काळभोर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, तालुका युवक अध्यक्ष सागर कांचन, संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, ओबीसी अध्यक्ष तालुका सुभाष टिळेकर, सरपंच विठ्ठल शितोळे, शिक्षक सेल जिल्हा सरचिटणीस बाळकृष्ण काकडे, अर्जुन कांचन, सुभाष बगाडे, विजय तुपे, मा.उपसरपंच सागर कांचन आदी उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचे काम करणार सर्वांना बरोबर घेऊन असे नुतन शहर अध्यक्ष रामदास तुपे यांनी सांगितले.

Previous articleहवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विजय तुपे यांची निवड : आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र
Next articleआत्मदहनाच्या इशाऱ्याची घेतली वीज कंपनी प्रशासनाने दखल :सचिन मेंगाळे