इनरव्हील क्लब व आदिशक्ती महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी कुंकू व आरोग्य शिबीर उत्साहात

किरण वाजगे-,नारायणगाव – येथे इनरव्हील क्लब आणि आदिशक्ती महिला प्रतिष्ठान यांनी हळदीकुंकू कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमात सौभाग्यवती महिलां सोबत श्रीमती महिलांना देखील आमंत्रण देण्यात आले. हळदीकुंकू कार्यक्रमा सोबत तिळगुळ समारंभ आणि महिलांनी अरोग्या बाबत जागरूक राहावे म्हणून ब्लड प्रेशर आणि शुगर तपासणी शिबीर देखील ठेवण्यात आले होते.
नारायणगाव मधील वेलकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी शिबिरासाठी आपले योगदान दिले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न लता दीदी यांचे प्रतिमा पूजन आणि पसायदानाने करण्यात आली. जवळपास २५० महिला या शिबिरात उपस्थित होत्या. त्यातील २०० महिलांची आरोग्य तपासणी झाली. त्यात ५० महिलांना शुगर आणि हाई बीपी झाला असल्याचे निदर्शनास आले.


कार्यक्रमांचे नियोजन सुजाता भुजबळ, अंजली खैरे इनरव्हील क्लबच्या सदस्या सविता खैरे, नंदिनी घाडगे, समृद्धी वाजगे, गीता गुगळे, नंदा मुथ्था, स्वाती मुदगल, सुनीता कोल्हे, शीतल जठार, कुंदा ईचके, रोहिणी जगदाळे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अंजली खैरे, सुजाता भुजबळ यांनी केले तर आभार समृद्धी वाजगे यांनी मानले.

Previous articleबी.डी.काळे महाविद्यालयात सावित्री महोत्सवाचे आयोजन
Next articleजुन्नरमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान द्राक्ष महोत्सव: सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सवाची मेजवानी