पेडगाव येथे विविध विकास कामांचे उदघाटन

दिनेश पवार : दौंड

पेडगाव (ता.दौंड) येथे खासदार सुप्रिया सुळे व पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या निधीतून एकूण ४२ लाख ९१ हजार रुपयांच्या विवध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करणे,शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवणे,गटातील धार्मिक सलोखा राखण्यासाठी भजन साहित्य भजनी मंडळांना वाटप करणे आदी उपक्रम वीरधवल जगदाळे यांनी राबवले आहेत.

या कार्यक्रमा प्रसंगी पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते, सरपंच संगीता इंदलकर,उपसरपंच शंकर घोडके,सुभाष नागवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे दीपक सोनवणे व गावातील ग्रामस्थ बंधू -भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकोयत्याचा धाक दाखवून मोटार चालकाला लुबाडले
Next articleबी.डी.काळे महाविद्यालयात सावित्री महोत्सवाचे आयोजन