शनिवार फनीवार उपक्रमाचे अनुकरण राज्यात व्हावे – शिवाजी डुंबरे

नारायणगाव : किरण वाजगे

कोरोना संसर्ग काळात मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवार फनीवार टीमने मोलाची कामगिरी केली असून असे उपक्रमशील कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शिक्षण संकुलात व्हावेत असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी शिवाजी डुंबरे यांनी केले.

ऍक्टिव्ह टीचर्स जुन्नर आयोजित ‘शनिवार फनिवार’ उपक्रमांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे नुकतेच आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री डुंबरे बोलत होते.


या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी लहान गट व पाचवी ते आठवी मोठा गट या दोन गटात आयोजित केली होती. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक नुकतेच शनिवार फनीवार टीम कडून सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले.

रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या वतीने देखील या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गेल्या सात महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी टीमने प्रसंगानुरुप विविध सणांचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर केले. त्याबद्दल टीमचे कौतुक पंचायत समिती जुन्नरच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे व विस्तार अधिकारी किसन खोडदे यांनी केले. शनिवार फनीवार या उपक्रमाचे आत्तापर्यंत एकूण २६ भाग झाले असून पुढेही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस प्रास्ताविकात मुख्याध्यापिका संगिता ढमाले यांनी व्यक्त केला.

यावेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे प्रेसिडेंट डॉ. शिवाजी टाकळकर, ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ आल्हाट, पंढरीनाथ विद्यालयाचे आदर्श शिक्षक महंमद मुलाणी, बालक मंदिर नारायणगावच्या मुख्याध्यापिका सुनीता पारखे, जेष्ठ पत्रकार किरण वाजगे, अतुल कांक्रिया यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमांच्या ई पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी प्रत्येक शनिवारी आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. तसेच सदर उपक्रमात आम्ही सहभाग घेतो. असे मत कुमारी वेदिका दिनेश मेहेर इयत्ता सातवी रा.प.सबनीस विद्या मंदिर या विद्यार्थिनीने व्यक्त केले. यावेळी मंतशा आतार बालक मंदिर नारायणगाव, मान्यता प्रदीप मुरादे चैतन्य विद्यालय ओतूर, पूर्वा संतोष खानदेशी जि.प.प्रा. शाळा मांजरवाडी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांमधून स्वाती संतोष खानदेशी आदर्श शिक्षिका विद्या विकास मंदिर अवसरी बु., बापूराव रामचंद्र शेलार सातारा, पुष्पलता संजय डोंगरे विज्ञान पदवीधर शिक्षिका मांजरवाडी यांनी टीमच्या कार्याबद्दल धन्यवाद देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बक्षीस पात्र विद्यार्थ्यांमध्ये लहान गटात १) मंतशा आरिफ आतार बालक मंदिर नारायणगाव (प्रथम) २) आरुष संतोष कांबळे जि.प.प्रा.शाळा ओतूर नंबर १ द्वितीय ३)विराज विठ्ठल जोशी जि.प.प्रा.शाळा तांबे (तृतीय) ४)अनुष्का बापूराव शेलार जि.प. केंद्रशाळा दिवशी, जि.- सातारा (उत्तेजनार्थ) ५)गीतांजली संतोष वायाळ जि.प.प्रा.शाळा महाळूंगे पडवळ ता. आंबेगाव ( उत्तेजनार्थ).
मोठा गट १) मान्यता प्रदीप मुरादे चैतन्य विद्यालय ओतूर (प्रथम)२) सुजीत लोहोटे पुष्पावती विद्यालय डिंगोरे (द्वितीय)३) पूर्वा संतोष खानदेशी, जि.प.प्रा.शाळा मांजरवाडी (तृतीय) ४)वैष्णवी भिवाजी कामठे श्री.मंगलमूर्ती विद्यालय रांजणगाव गणपती (उत्तेजनार्थ) ५) वेदिका दिनेश मेहेर रा.प.सबनीस नारायणगाव (उत्तेजनार्थ) इ. विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डॉ. शिवाजी टाकळकर प्रेसिडेंट रो.क्लब नारायणगाव हायवे , श्यामराव थोरात माजी अध्यक्ष रो. क्लब नारायणगाव हायवे बाळासाहेब गिलबिले, माजी अध्यक्ष रो.क्लब नारायणगाव हायवे अंबादास वामन आय.पी.पी क्लब रो. क्लब ना.गाव हायवे, रवींद्र वाजगे सेक्रेटरी रो.क्लब ना.गाव हायवे, डॉ.श्रीकांत फुलसुंदर, प्रा. बाळासाहेब ढमाले , काशिनाथ आल्हाट, सातपुते सर, पत्रकार किरण वाजगे, प्रा.अशोक भूमकर प्रा.वैशाली मोडवे , डॉ.मधुरा काळभोर, वैशाली फुलसुंदर, रोहिणी गिलबिले, उर्मिला वाजगे, अंजली सोमवंशी ,विजया तोडकर, संतोष शिंदे , समीर भारती, रेखा ब्रम्हे, भारती डुंबरे, समृद्धी वाजगे, जोशी सर, बनकर मॅडम, सुरेश गडगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विस्तार अधिकारी पळसकर सर, विष्णू धोंडगे सर, केंद्रप्रमुख किशोर दगडे सर, श्री.बांगर सर यांनीही या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगिता ढमाले यांनी केले. सूत्रसंचालन उषा टाकळकर यांनी केले तर आभार प्रशांत ढवळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ कनिंगध्वज, भारती आल्हाट शुभांगी पाडेकर आणि रोहिणी गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleउद्योजिका विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून शनेश्वर स्व.महिला बचत गटातील महिलांना ट्रेनिंग
Next articleतीन सराईत गुन्हेगारांना अटक करून दिड लाखाचे सोन्याचे दागिने जप्त : लोणी काळभोर पोलीसांची कामगिरी