उद्योजिका विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून शनेश्वर स्व.महिला बचत गटातील महिलांना ट्रेनिंग

घोडेगाव : हक्कदर्शक आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान विभाग आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीने शनेश्वर स्व.महिला बचत गट यांना “चणा फुटना मशीन ” यावेळी देण्यात आले.

७ जानेवारी २०२२ रोजी हक्कदर्शक व MSRLM विभाग आंबेगाव यांच्या माध्यमातून KVK येथे घेण्यात आलेल्या उद्योजिका विकास प्रकशिक्षणच्या माध्यमातून ७० महिलांना ट्रेनिंग देण्यात आले.तसेच चर्चेच्या माध्यमातून चणा फुटना मशीन बाबत निवेदिता शेटे यांनी मार्गदर्शन केले तर काही दिवसातच हक्कदर्शकच्या माध्यमातून कागदपत्रची पूर्तता आणि सततचा पाठपूरावा केल्यामुळे हे मशीन या बचत गटास देण्यात आल्याचे सांगितले गेले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बी.एम त्रंबक पारासुर सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिला बचत गटाच्या पूनम काळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले या वेळी सूत्र संचालन दीपक सैदाणे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता लता केंगले यांनी केली.

या प्रसंगी MSRLM BM त्रंबक पारासुर सर,कृषी विज्ञान केंद्र येथील गृह विद्यान तज्ञ निवेदिता शेटे,शनेश्वर स्व.महिला बचत गटाचे पुनम काळे,दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील दरेकर, हक्कदर्शकचे दीपक सैदाणे आदि मान्यवर उपस्थीत होते.

Previous articleलॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी ने कंबर कसली, कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि खानपान बाबतचं अत्याधुनिक प्रशिक्षण
Next articleशनिवार फनीवार उपक्रमाचे अनुकरण राज्यात व्हावे – शिवाजी डुंबरे