वाघोलीत शांताराम बापु कटके व शनीभाऊ शिंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सव संपन्न

 

गणेश सातव ,वाघोली- पुणे

वाघोली गावचे माजी उपसरपंच,अनंत पतसंस्थेचे संस्थापक शांताराम कटके व सामाजिक कार्यकर्ते शनीभाऊ शिंगारे यांच्या संयुक्त सौजन्याने वाघोली येथील श्रेयश गार्डन मंगल कार्यालयात भव्य नोकरी महोत्सव पार पडला.

यावेळी महोत्सव सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन,दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शांतारामबापु कटके यांनी आपल्या प्रास्ताविकात आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सव आयोजनामागील संकल्पना विषद केली व उपस्थित तरुणांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या महोत्सवात विविध क्षेत्रातील जवळपास ३० कंपन्यांचे स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले होते.

यामध्ये महिंद्रा अँन्ड महिंद्रा,टाटा टेलीकम्युनीकेशन,युरेका फोर्ब,यशस्वी ग्रुप,सुमीत  फँसेलिटीज्,टि.व्हि. एस.सप्लाय चैन सोलुशन,पासून अगदी नव्याने सुरु झालेल्या सामान्य स्टार्ट अपचा हि यात समावेश होता.

अगदी १० वी,१२ वी,आय.टि.आय सह विविध क्षेत्रातील डिप्लोमा,डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी, तरुणवर्ग, महिला या नोकरी मेळाव्यात सहभागी झाले होते.नोकरीच्या शोधात असणाऱ्या २००० सहभागीं पैकी जवळपास ७५० जणांना यातून विविध कंपन्यांच्या सेवेत संधी मिळाली आहे.

कोरोना व इतर आजारांच्या पार्श्वभूमीवर,नोकरी महोत्सवाचे औचित्य साधून तर्पण ब्लड बँक व विश्वराज हॉस्पिटलच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर महोत्सव स्थळी पार पडले.महोत्सवात सहभागी झालेले तरुण-तरुणी, पालक, उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या संख्येने रक्तदान करुन शिबीरात आपला सहभाग नोंदवला.

यावेळी आयोजक शांताराम कटके,शनी शिंगारे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय सातव पाटील,मिनाकाकी सातव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे,अर्चना कटके,माजी सरपंच वसुंधरा उबाळे,शिवदास उबाळे,शिवसेना हवेली तालुका प्रमुख राजेंद्र पायगुडे,पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव(गवळी)अनंत पतसंस्था चेअरमन सोमनाथ आव्हाळे, संदीप सातव,योगेश खुळे,गणेश हरगुडे,अविनाश मरकळे,सागर गोडसे,सोमनाथ कटके,विक्रम वाघमारे,हिराभाऊ वाघमारे,दिपक भंडलकर,ऋषीकेश गावडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

जी.आर.बी.सोलुशन जॉब्स् प्रो आणि डिजिटल पार्टनरचे आरती गवंडी,राधिका साखरे,गुरुदेव गवंडी,प्रकाश पवार यांनी आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले.

महोत्सवानिमित्ताने सहभागी झालेल्या कंपन्या,उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शनीभाऊ शिंगारे यांनी केले.राजेश आव्हाळे यांनी सुत्रसंचालन केले,तर आभार अबीद शेख यांनी मानले.

Previous articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय भागवत यांचा सेवा निवृत्त निमित्ताने माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विशेष सन्मान
Next articleआरोग्यदायी जीवनासाठी योगा करणे महत्वाचे-डॉ.सुनीता कटारिया