पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय भागवत यांचा सेवा निवृत्त निमित्ताने माजी विद्यार्थी संघाच्या वतीने विशेष सन्मान

उरुळी कांचन

ज्यांनी आम्हाला विद्यार्थी असताना चांगले संस्कार घडवले तसेच मार्गदर्शन केलं म्हणून तर आज या धावपळीच्या जीवनात जो तो चांगल्याप्रकारे काम करत आहे. सुंदर जग चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी या जगाला कस ओळखायचं याच ज्ञान दिलं आयुष्याच्या प्रवासात कुठुन कस वळायचं याच मार्गदर्शन केलं. आम्हाला आमच्या ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी मनापासून आपलं कर्तव्य निभावलं अशा सुखद अनुभव विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ.संजय भागवत यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी मनमोकळेपणाने मांडल्या.
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील सेवा निवृत्त निमित्ताने प्रा.डॉ.संजय भागवत यांचा विशेष सन्मान सोहळा माजी विद्यार्थी संघाने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रा.डॉ.एस.व्ही आबनावे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शिक्षक सेलचे सरचिटणीस बाळकृष्ण काकडे, महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर, गोपीनाथ बोत्रे, सरचिटणीस सांस्कृतिक विभाग प्रदेश विजय तुपे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश गायकवाड, उपाध्यक्ष जगदीश महाडिक, सचिव निलेश जाधव, सोमनाथ शेलार, योगेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी, अनिल जगताप, शितल शेवाळे, प्रतिभा शिरसाठ आदी विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

Previous articleमीना शाखा कालव्याला नारायणगाव येथे भगदाड:अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
Next articleवाघोलीत शांताराम बापु कटके व शनीभाऊ शिंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सव संपन्न