उरुळी कांचनच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – आमदार अशोक पवार

उरुळी कांचन

येथील वाढत्या लोकसंख्येच्या दुष्टीने शाश्वत विकास नागरिकांना अपेक्षित असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती, पुणे जिल्हा नियोजन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थाच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. भविष्यात विकासकामे करत असताना निधीची कमतरता जाणू देणार नाही फक्त कामे करत असताना गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. गावाच्या दुष्टीने ज्या काही समस्या असतील ते ही उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवण्यासाठी प्रयत्न करतो असे मत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

उरुळी कांचन येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना, ग्रामसचिवालय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तुपे वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण – बायफ रस्ता करणे, दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण, रेल्वे पुल मोरी बंदिस्त गटर करणे कॉक्रीटीकरण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये शवविच्छेदन रुम बांधणे, ओझोन संक्शन गाडी, रुग्णवाहिका गाडी, घंटागाडी खरेदी करणे, फिल्टर प्लॉट नुतनीकरण करणे, स्मशानभूमी मध्ये शवदाहीनी बांधकाम करणे अशा प्रकारे विविध विकास कामाचे भूमीपूजन व कोनशिला अनावरण उपस्थित आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते प्रा.के.डी.कांचन, माजी सरपंच माऊली कांचन, माजी जि.प.सदस्य महादेव कांचन, जिल्हा परिषद सदस्य कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता बगाडे, चेअरमन राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, माजी सरपंच आण्णा महाडिक, विश्वस्त राजेंद्र टिळेकर, जेष्ठ नागरिक अध्यक्ष प्रदेश सोनबा चौधरी, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, राजेंद्र कांचन, भाऊसाहेब कांचन, मयूर कांचन, सुनिल तांबे, शंकर बडेकर, संचिता कांचन, सिमा कांचन, ऋतुजा कांचन, स्वप्निशा कांचन, प्रियंका कांचन-पाटेकर, अनिता तुपे, सुजाता खलसे, ग्रामविकास अधिकारी वाय. जे. डोळस, सरपंच विठ्ठल शितोळे, सागर कांचन, युवराज कांचन, भाऊसाहेब कांचन,अलंकार कांचन, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संतोष कांचन यांनी केले तर सुत्रसंचालन सदस्य सुनिल तांबे, आभार सुभाष बगाडे यांनी मांडले.

Previous articleराजेगांवची गौरी कडू आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत प्रथम
Next articleआमदार अशोक पवार यांच्या हस्ते सणसवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ संपन्न