राजेगांवची गौरी कडू आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत प्रथम

दिनेश पवार : दौंड

राजेगाव (ता.दौंड ) येथील गौरी बापू कडु पाटील हिने दि. २९ ते ३१ जानेवारी २०२२ रोजी नेपाळ मध्ये चार देशांमध्ये आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत श्रीलंका ,भुतान , नेपाळ, भारत यांचे मध्ये २९ ते ३१ जानेवारी दरम्यान लढत झाली त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करित आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवून गौरी हिने भारतीय संघाला प्रथम क्रमांक मिळवून दिला त्याबद्दल सर्व खेळाडुंचे अभिनंदन व गौरी हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून येत्या एप्रिल महिन्यात श्रीलंका मध्ये पाच देशात वर्ल्ड चॅम्पियन शिप स्पर्धा होणार आहेत.

अफगाणिस्तान, भुतान, मालदीव, श्रीलंका, भारत या देशांमध्ये स्पर्धा होणार आहेत. या वर्ल्ड चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये भारतीय संघास प्रथम क्रमांक मिळावा या साठी भारतीय वर्ल्ड चॅम्पियन शिप संघाचे प्रशिक्षक, गौरी व सहकारी खेळाडू संघाला पुढील वाटचालीस राजेगाव मधील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या .

Previous articleजांभोरी येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर
Next articleउरुळी कांचनच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – आमदार अशोक पवार