दावडी गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रामदास बोत्रे व व्हाईस चेअरमनपदी विजय ओव्हाळ यांची बिनविरोध निवड

Ad 1

राजगुरुनगर– दावडी गावाच्या विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमनपदी रामदास बोत्रे व व्हाईस चेअरमनपदी विजय ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली.हा कार्यक्रम खेड तालुका कृषिउपन्न बाजार समिती मध्ये पार पाडला,निवडणूक अधिकारी म्हूणन ए बी मुलाणी साहेब यांनी काम पाहिले.यावेळी त्यांचा गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित गावचे माजी पोलीस पाटील तुकाराम गाडगे,विद्यमान पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, युवा उद्योजक संभाजीआबा घारे, मा चेअरमन साहेबराव दुडें,दत्तात्रय मांजरे, बाळासाहेब वाघिरे, संतोष गावडे,मल्हारी तरटे,काळूराम शिंदे उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन रामदास बोत्रे बोलताना म्हणाले की शेतकऱ्यांना ना पीक कर्ज, व गावाच्या शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे लक्ष देणार आहे असे मनोगत वक्त केले,व आभार मल्हारी तरटे यांनी केले.

जाहिरात