जांभोरी येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर

घोडेगाव- नांदूरकीचीवाडी (जांभोरी) येथील ग्रामविकास प्रतिष्ठानाच्या संचालक मंडळाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.मावळत्या संचालक मंडळाच्या पाच वर्ष्याच्या कालावधीत ,अनेक समाज उपयोगी कार्य करण्यात आले ,त्यामध्ये प्रामुख्याने150 घरांना दलीतवस्तीसह शुद्धपाणी नळजोड देण्यात आला,10 लाख खर्च उभारण्यात आला ,त्याच प्रमाणे,प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली .

परिसरातील 10 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षरोपन, आरोग्यसुविधा,कोरोना काळात 500 कुटुंबांना किराणा किट वाटप, गरजूदुर्धर आजारी ,अपघातग्रस्त लोकांना मदत,शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप, आदर्श गाव निर्मिती,अशाप्रकारची अनेक समाजोपयोगी कामे करण्यात आली. संचालक मंडळाचे पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवीन संचालक मंडळाची नेमणूक करण्यात आली.

१)अध्यक्ष – अंकुश नामदेव केंगले
२)उपाध्यक्ष – लक्ष्मण बबन केंगले
३)कार्यध्यक्ष -प्रमोद सूर्यकांत केंगले
४) सचिव -बाळासाहेब दशरथ केंगले
५) खजिनदार – शंकर पंघाजी गिरंगे
६)उपसचिव -शंकर रामचंद्र भवारी
७)सभासद -नवनाथ दत्तात्रय केंगले
८)सभासद -दत्तात्रय टल्हाजी गिरंगे
९) सभासद -बबन किसन केंगले
१०)सभासद – विजय किसन केंगले
११) सभासद -मोघा सोमा भवारी
१२)सभासद – संतोष मारुती केंगले
१३) सभासद -सौ विमल धर्मा गिरंगे

सर्व संचालक मंडळाचे ग्रामस्थांच्या वतीने ,मावळते अध्यक्ष जगदीश दगडू केंगले ,उपाध्यक्ष ,शरद प्रभाकर बांबळे , यांच्या हस्ते करण्यात आला , कार्यक्रमाचे अध्यक्ष ,उपसरपंच विलासराव केंगले यांनी भूषविले ,पोलीसपाटील नवनाथ केंगले आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले ,संतोष भवारी पाणी कमिटी संचालक उपस्थित होते.सूत्रसंचालन मावळते कार्याध्यक्ष राज्यशिक्षक पुरस्कार विजेते किसन तुकाराम गिरंगे यांनी केले ,आभार अंकुश गिरंगे यांनी मानले

Previous articleवाघोली येथे  बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी : शांताराम कटके यांचा स्तुत्य उपक्रम
Next articleराजेगांवची गौरी कडू आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेत प्रथम