Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
उरुळी कांचन
कोरोनामूळे आज हजारो युवकांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. त्यातच नवीन सुशिक्षित युवकांवर बेरोजगारी च्या संकटाशी सामना करण्याचे आव्हान आहे. अशा गरजू युवकांना नोकरी मिळून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपसरपंच तथा हवेली तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शांताराम कटके, शनिभाई शिंगारे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने वाघोली येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाचवी ते बारावी पास, पदवीधर पदव्युत्तर, डिप्लोमा, आयटीआय, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवारी श्रेयस मंगल कार्यालयात नोकरी महोत्सव होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते शांतारामबापू कटके यांनी दिली आहे. जास्तीत जास्त युवकांनी फॉर्म भरून या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन कटके यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.