आमदार रमेश थोरात यांचा जीवनसाधना पुरस्कारान गौरव

योगेश राऊत , पाटस

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या जीवनसाधना गौरव या पुरस्काराने रमेश थोरात यांना सन्मानित करण्यात आले आहे.वयाच्या अवघ्या २४ वर्षापासून त्यांनी सरपंच पदापासून सामाजिक कामाला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांची अथक जनसेवा सुरूच आहे.

राजकारण करत असताना त्यांनी समाजाच्या भावना, गरज लक्षात घेऊन समाजाला जे काही देता येईल त्यासाठी पावले उचलली. त्यामुळे लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत गेला.सामाजिक कार्या बरोबरच त्यांचे सहकार क्षेत्रातील योगदान देखील अतुलनीय असे आहे. गेल्या ३८ वर्षापासून ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लोकांसाठी काम करत आहेत.

शेतकरी कष्टकरी, जनतेची जाण असलेल्या रमेश थोरात यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकरी जनतेला केंद्रस्थानी ठेवून दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन, सिंचन सुविधा , तसेच शेतीला पूरक उद्योगांना चालना देऊन भरीव योगदान दिले.
तसेच २००९ ते २०१४ या पाच वर्षात त्यांनी दौंड तालुक्याचे आमदार म्हणून अनेक विकासात्मक कामे केली आहेत. आज त्यांनी केलेल्या कामाचा अभिमान तर आहेच.रमेश थोरात यांनी सामाजिक आणि सहकार या क्षेत्रात गेल्या ४७ वर्षापासून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज त्यांना गौरवण्यात आले. यांचा एक दौंडकर म्हणून आम्हाला अपार आनंद आहे.

Previous articleशिवनेरी ते भोसरी पीएमपीएल बसचे नारायणगावात उत्साहात स्वागत
Next articleवाघोली येथे  बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी : शांताराम कटके यांचा स्तुत्य उपक्रम