कनेरसर शाळेत कामगार चळवळीचे नेते नारायण लोखंडे यांची पुण्यतिथी साजरी

राजगुरूनगर- कनेरसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कनेरसर गावचे मुळ रहिवाशी कामगारांना १० जून १८९० पासून हक्काची रविवारची सुट्टी मिळवून देणारे ,कामगार चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याविषयी शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ गावडे यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमास कनेरसर केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे,माजी केंद्रप्रमुख नारायण गावडे,मोरेश्वर दौंडकर, वसंत नेटके,बाबाजी लोखंडे,जगन्नाथ लोखंडे,शाळेतील शिक्षिका अंजली शितोळे,सारिका राक्षे,शुभांगी जाधव, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका राक्षे यांनी केले.आभार अंजली शितोळे यांनी मानले.

Previous articleशिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी शिक्षकांच्या पाठीवर दौंड पंचायत समितीची कौतुकाची थाप
Next articleवाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश