अजित मेदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरवाडीतील गरजु कुटुंबांना ब्लँकेट वाटप

चाकण – मेदनकरवाडी येथील उद्दोजक आणि सामाजिक कार्याची आवड असणारे अजित लक्षमण मेदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यातील बुरसेवाडी येथील ठाकरवाडीतील १५ गरजू कुटुंबांना थंडीच्या दिवसात संरक्षण व्हावे या करिता ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

गेली ७ वर्षापासुन अजित मेदनकर हे आपला वाढदिवस खर्चिक डामडौलाने साजरा न करता समाजिक संस्थांना मदत करत असतात त्यामधे कनेरसर येथील द्वारका वृध्दाश्रम, जुन्नर येथील शिवऋण संस्था, भोसरी येथील अशोक देशमाने यांचे स्नेहवन अनाथश्रम, अशा विविध संस्थाना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

वाढदिवसावर होनारा खर्च टाळुन गोर गरिबांना केलेली मदत ही अत्यंत समाधान देणारी आहे असे प्रतिपादन अजित मेदनकर यांनी व्यक्त केले. बुरसेवाडीच्या ठाकरवाडीतील गरजु कुटुंबांना ब्लॅंकेट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान दिसुन येत होते. यावेळी अजित मेदनकर शिक्षक सोसायटीचे माजी उपसभापती आणि कान्हेवाडी येथील ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय घुमटकर सर,हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संस्थापक कैलास दुधाळे, संतोष रायकर उपस्थित होते.

Previous articleचाकण चँम्पिअन्सने पटकावला राजा शिवछत्रपती चषक
Next articleनिमदरी मध्ये एनएसएसच्या शिबिरा महिला जाणीव जागृती उपक्रमाचे आयोजन