चाकण चँम्पिअन्सने पटकावला राजा शिवछत्रपती चषक

राजगुरूनगर- खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा यांच्या वतीने आयोजित केलेल्या राजा शिवछत्रपती चषक या सलग दुसऱ्या वर्षीच्या शिक्षक क्रिकेट लीग स्पर्धा खेड तालुक्यातील कडूस येथील योगेश धायबर क्रीडा संकुल या ठिकाणी शनिवार दि ५ फेब्रुवारी व रविवार दिन ६ फेब्रुवारी २०२२ या दोन दिवशी अतिशय उत्साहात व दिमाखात संपन्न झाल्या.

खेड तालुक्यातील वाडा , डेहणे , कुडा , कडूस , खरपुडी , खेड , पाईट व चाकण या आठ बीटमधील आठ संघामध्ये प्रथम दोन गटात प्रत्येकी तीन साखळी सामने खेळविण्यात आले. दोन्ही गटातून चाकण चॅम्पियन्स , जय मल्हार खरपुडी , सनरायरर्स वाडा व रॉयल चॅलेंजर्स कुडा हे चार संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले.या चार विजेत्या संघांमध्ये दोन सेमी फायनल मॕच होऊन अंतिम फायनल सामना चाकण चँम्पियन्स व जय मल्हार खरपुडी या दोन संघात अतिशय अटीतटीचा होऊन चाकण चँम्पियन्सने निर्णायक विजय प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे ७७७७ रू. व चषक मिळविला. जय मल्हार खरपुडी संघास द्वितीय क्रमांकाचे ६६६६ रू. व चषक देऊन गौरविण्यात आले. तृतीय क्रमांक सनरायरर्स वाडा संघास ५५५५ रू व चषक आणि चतुर्थ क्रमांक रॉयल चॅलेंजर्स कुडा या संघास ४४४४ रू. व चषक देऊन गौरविण्यात आले. मॕन आॕफ दी सिरीजचा किताब चाकण संघाच्या राजेश कराळे यांनी पटकावला.

सेमी फायनल व फायनल सामन्यात चाकण संघातील राजेश कराळेंसह अनिल नाईकरे ,साहिर सिकिलगार, प्रशांत आंधळे ,विवेकानंद गायकवाड, जितेंद्र डेरे, खरपुडी संघातील दिलीप देशमुख , संजय सुपे , सुनिल धुमाळ , रामदास अरगडे , नामदेव मुंडे , वाडा संघातील धनाजी कोळी , सतीश भालचिम , मंगेश वायाळ , विलास निसरड व कुडा संघातील अमित भोंग , असिफ शेख , तौसिफ शेख , संजय तुपे , विजय दाभाडे या शिक्षक खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण अष्टपैलू खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील खेळाडू शिक्षकांना शुभेच्छा व प्रेरणा देण्यासाठी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील , पंचायत समितीचे मा. सभापती अंकुश राक्षे , गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे , पुणे महानगर सदस्य वसंतशेठ भसे , समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पदवीधर संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल पलांडे सर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी खेड शिक्षक पतसंस्थेचे मा. सभापती दत्तात्रय शिनगारे , संजय राळे , विस्तार अधिकारी रोहिदास रामाणे , राष्ट्रपती पारितोषिक विजेते द.मा.पिंगळे , रविंद्र मावळे , केंद्रप्रमुख गजानन पुरी , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शांताराम थिगळे , राजाराम बोंबले व मोठ्या संख्येने तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे , तालुकाध्यक्ष नारायण करपे , महिला आघाडी अध्यक्षा संजीवनी चिखले, नामदेव गायकवाड , संदीप म्हसुडगे , दगडू पिंगळे, रवींद्र मावळे, रवींद्र पाचारणे,शामकान्त बारणे,खंडू काटे,जालिंदर दिघे , मारूती दिघे , साहिर सिकिलगार, विवेकानंद गायकवाड ,संतोष नेटके, भाऊराव पाण्डे ,दिनेश ठाकूर ,प्रभाकर शिंदे ,कुंडलिक सातकर ,बाजीराव भाडळे, सुरेश देशमुख, मुकुटराव मोरे , संदीप जाधव , तुषार वाटेकर , बाबाजी शिंदे ,डी. के. शिंदे, कल्याण पिंगळे , अशोक सावंत , दिलीप देशमुख , मधुकर गिलबिले , खंडू काठे , रामदास लांघी , मुरलीधर कोहिणकर , श्यामकांत बारणे, महेंद्र गाडे, गणेश गोरे ,संतोष दौंडकर,जितेंद्र डेरे, पांडुरंग आव्हाड, वसंत तळपे ,तुकाराम भोसकर ,संदेश गावडे ,शंकर कड व तालुका कार्यकारीनी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. स्पर्धेच्या ठिकाणी दोन्ही दिवस संघटनेच्या वतीने उत्तम जेवणाची सोय करण्यात आली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला आघाडी सदस्यांनीदेखील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद अनुभवला.

Previous articleदिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील हिवरे, तसेच मुखई व जातेगांवच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
Next articleअजित मेदनकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरवाडीतील गरजु कुटुंबांना ब्लँकेट वाटप