दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील हिवरे, तसेच मुखई व जातेगांवच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

शिरूर – तालुक्यातील हिवरे, तसेच मुखई व जातेगांव येथील रस्ते, पूल, व्यायामशाळा, सभागृह आदी विकासकामांचे भूमिपूजनाच्या सोहळ्यास उपस्थित राहताना राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना संसर्गाची परिस्थिती आता आटोक्यात येत असून राज्याची आर्थिक परिस्थितीही पूर्वपदावर येत आहे. कोरोना दरम्यानच्या काळात विकासकामांची गती मंदावली होती. आता कोरोना निर्बंध सैल होत असताना आम्ही विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. मात्र कोरोनाचा प्रभाव पूर्णतः संपलेला नाही. सर्वांनी आरोग्याची काळजी घेऊनच विकासकामांतील सहभाग वाढवावा असे, यावेळी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले.

शिक्रापूर-पिंपळे खालसा रस्ता, तसेच खैरेवाडी ते कान्हूर मेसाई रस्ता या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला असून हिवरे नजीक कालव्यातून सिंचनासाठीचा पाणी उचल परवाना, पीएमपीएमएल बस वाहतूक व्यवस्था, ग्रामसचिवालय सभागृह बांधकाम निधीची तरतूद, हिवरे ते व्यंकटेशकृपा साखर कारखाना रस्ता, हे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत जि.प. सदस्या श्रीमती सविता बगाटे, पं. स. उपसभापती सविता पऱ्हाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, इतर मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व अभियंते यांच्या उपस्थितीत आश्वस्त केले आहे

Previous articleपाटसला सुसज्ज आरोग्य केंद्र सुरु करणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन
Next articleचाकण चँम्पिअन्सने पटकावला राजा शिवछत्रपती चषक