कृष्णाई विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी तुषार दादा थोरात यांची बिनविरोध निवड

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

गलांडवाडी (ता.दौंड) येथील कृष्णाई विविध सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माजी आमदार तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांचे चिरंजीव तुषार रमेश थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली,निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टकसाळे यांनी कामकाज पाहिले.

यावेळीदौंड बाजार समितीचे संचालक उत्तम ताकवले,खुटबाव चे सरपंच शिवाजी थोरात,संचालक डॉ.राजेंद्र कदम,सचिव गणेश पाडळे,उपस्थित होते, तुषार यांचे सामाजिक कार्यतील योगदान तरुणांना पाठबळ देणारे आहे,तुषार यांची सहकार क्षेत्रातून राजकारणात सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सहकार क्षेत्रात नक्कीच भरीव कामगिरी होईल असा विश्वास परिसरातून व्यक्त केला जात आहे,यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सन्मान करण्यात आला

Previous articleपत्रकारांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ऋतुजा आमले हिचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले