दौंडच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश

दिनेश पवार, दौंड

गोवा मडगाव येथे घेण्यात आलेल्या युथ ऑलिम्पिक रोलर गेम फेडरेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दौंड मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेत वेगवेगळ्या राज्यातून एकुण 300 विध्यार्थीनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये दौडच्या विध्यार्थ्यांना 10 सुवर्ण, 6 रौप्य, 4 कांस्य पदक मिळाले.

विजेत्यांची नावे
सुवर्णपदक-तनय काकडे, स्वराज सोनवणे, शुभम वाघ, संदीपन बनिक, अंजली राठोड, स्वरा सोनवणे, जान्हवी जंजाले, कोमल तावरे,श्रेया सोनवणे, प्रज्वल लोणकर.

रौप्य पदक- सौरभ वाघ, गिरीष घाडगे, समृद्धी बनिक, वैष्णवि येवले, कविता चव्हाण, समृद्धी बंडगर.

कांस्य पदक – मृन्मय भागवत, विराज पवार, ओमकार गरुड, वैशाली गुजर.

या विद्यार्थ्यांना राजेंद्र डी. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष सोनवणे सर यांचे प्रशिक्षण लाभले मा. हिरालाल साळवे, गणेश कुंदे, कृष्णा अडगळे, मनोज मदने,श्रुती कटारिया, सागर रकटे,हर्ष पोकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleगणेश जयंती निमित्त भाविकांची गर्दी ; थेऊर देवस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त
Next articleपहिली ते आठवीचे वर्ग सोमवारपासून पूर्णवेळ सूरू होणार – अजित पवार