गणेश जयंती निमित्त भाविकांची गर्दी ; थेऊर देवस्थानच्या वतीने चोख बंदोबस्त

उरुळी कांचन

आज माघ महिन्यात विनायकी चतुर्थी गणेश जयंती निमित्त एरव्ही पेक्षा भाविकांची गर्दी आज प्रामुख्याने जादा होती. पहाटे राजेंद्र आगलावे यांनी श्रींची पुजा केली. देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. देवस्थान तर्फे भाविकांनासाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृहे यांची चोख व्यवस्था होती. सेनिटायसर श्री व्यवस्था करण्यात आली होती. मासक सोशल डिस्टन्टिंग बाबत भाविकांना मार्गदर्शन करण्यात येत होते. सर्व व्यवस्थेवर चिंचवड देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. आनंदमहाराज तांबे लक्ष ठेऊन होते.

मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच रमाकांत पवार यांच्या कडून फुलांची आराज करण्यात आली होती. आगलावे बंधू तर्फे मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री परंपरे प्रमाणे श्रींचा छबिना काढण्यात आला. गणेश जयंती निमित्त श्रींना भरजरी पोषाख घालण्यात आला होता. उरुळीकर,हिंजवडी कर देव मंडळी कडून श्रींना अभिषेक करण्यात आला. श्रींना रात्री पासून पहाटे पर्यंत पिरंगुटकर देव व उरुळीकर देव मंडळी कडून धूपारतीचा कार्यक्रम झाला.सायंकाळी चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

Previous articleगणेश जयंती निमित्त ओझरच्या विघ्नहराचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन
Next articleदौंडच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत यश