शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी

अवघ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवला. ज्या छत्रपतींनी हिंदुस्थानला ताठ मानेने जगायला शिकवले त्यांच्याबद्दल अस कृत्य करताना या कर्नाटक भाजप सरकारला लाज कशी वाटली नाही. राजकारण जरूर कराव परंतु ज्यांचा आशिर्वाद घेऊन तुम्ही निवडणूक लढवली त्यांच्याबाबतीत अस कृत्य करायचे धाडसच कसे झाले या सरकारचे, ज्यांच्या समोर जग सुद्धा नतमस्तक होते त्या राजा समोर अशा पवित्र राजाच्या पुतळयाची विटंबना करताना भिती सुद्धा नाही वाटली. औरंगजेब सुद्धा नतमस्तक झाला अशा राजाच्या बाबतीत हिंदुस्थानांत अस व्हाव हीच मोठी खंत आहे. हिंदूचा नारा मिरवता व असे कृत्य करता हे शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या नेतृत्वाखाली तमाम खडकवासला मतदारसंघातील शिवसैनिकांनी या कृत्याबद्दल भाजप कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला व हे सहन करणार नाही जाहीर आवाहन करण्यात आले.

Previous articleआंबेगाव तालुक्यात वाळू माफियांचा नंगानाच ;दोन पत्रकारांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न
Next articleपत्रकारांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी