नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आळंदीत आत्मक्लेश

उरुळी कांचन

महात्मा गांधी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला आळंदी येथील इंद्रायणी घाटावर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली आणि आत्मक्लेश करीत या चित्रपटात नथुरामची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

‘व्हाय किल आय गांधी’ चित्रपटात नथुरामची भूमिका केली त्यांना पण ती विचारधारा स्वीकारली असा त्याचा अर्थ अजिबात नाही हे स्पष्ट करताना एखादं नाटक, लेख किंवा एखाद्या चित्रपटामुळे महात्मा गांधी यांची विचारधारा पुसली जाणार नाही. मात्र या भूमिकेवर तरुणांमध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया उमटली ती पाहाता यातून गांधींजींचे विचार आजही तरुणाईत तितकेच प्रभावीपणे रुजले असल्याचे दिसून आले ही महत्त्वाची बाब आहे.

महात्मा गांधी यांच्या खुनाचे आपण कधीही समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही हे मी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. मात्र या भूमिकेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याप्रती दिलगिरी व्यक्त केली.

Previous articleउरुळी कांचन मधील अवैध सावकाराचा फास आवळला
Next articleआजचा अर्थसंकल्प देशाला अधोगतीकडे नेणारा- रविकांत वरपे