आंबेगाव तालुक्यात वाळू माफियांचा नंगानाच ;दोन पत्रकारांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे व साकोरे येथे अवैध रीत्या सुरु असलेल्या वाळू चोरीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या आंबेगाव तालुक्यातील दैनिक जनप्रवास चे पत्रकार प्रफुल्ल मोरे व संतोष सावंत यांना वाळूमाफियांनी जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की वडगाव काशिंबेग परिसरात अवैधरित्या वाळू उपसा होत असलेली माहिती पत्रकार प्रफुल्ल मोरे यांना मिळाली असता ते पत्रकार सावंत यांना बरोबर घेऊन त्याठिकाणी वार्तांकन करण्यासाठी गेले होते त्या वेळी घोड नदीत वाळू माफियां व त्यांच्यात बाचाबाची होऊन वाळू माफियांनी त्यांच्यावर खुनी हल्ला केला तसेच त्यांचे कॅमेरा व मोबाईल हिसकावून घेऊन त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात पत्रकार प्रफुल्ल मोरे व सावंत जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना आज रविवारी रात्री साडेसहा ते सातच्या दरम्यान घटली असून या घटनेचा आंबेगाव तालुका पत्रकार संघ ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघच्या वतीने तीव्र निषेध नोंदवला आहे. आंबेगाव तालुक्यात दिवसेंदिवस वाळूमाफियांची दहशत वाढली असून ही दहशत संपवण्यासाठी महसूल पोलीस यंत्रणेने निर्भीडपणे काम करावे व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात कोणी हस्तक्षेप करणार नाही अशी अपेक्षा जेष्ठ पत्रकार डी. के. वळसे यासह सर्व पत्रकार बांधव यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रफुल्ल मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाळूमाफियांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे सांगितले तसेच या वाळू माफियांच्या मागे अनेकांचे वरदहस्त असल्याने ते तालुक्यात राजरोसपणे वाळू उपसा करत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील अनेक पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे

Previous articleमुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद-खासदार डॉ. अमोल कोल्हे
Next articleशिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध