मुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद-खासदार डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव,किरण वाजगे-जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीने तालुक्यातील सर्व कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीआरोग्य सुरक्षा किट उपलब्ध करून दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांन केले.

रघुकुल मंगल कार्यालय नारायणगाव येथे जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार ‘ वितरण आणि ‘आरोग्य किट वाटप’ कार्यक्रमात खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके जि.प.सदस्य पांडुरंग पवार,सरपंच योगेश पाटे तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, मुस्लिम समितीचे अध्यक्ष सादिक आतार, उपाध्यक्ष समद इनामदार, सचिव मेहबूब काझी, सहसचिव अशफाक पटेल, सदस्य मुबारक तांबोळी, हाजी रज्जाक कुरेशी, आरिफ आतार, रईस मणियार, रऊफ खान,हाजी कदिर मोमीन, रऊफ इनामदार, अजीम तिरंदाज, रिजवान पटेल, वाजिद इनामदार, सलीम पटेल, रफिक शेख, फिरोज पठाण, फकीर आतार,नसीर अहमद, अजीम इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘ चांगले रस्ते,वीज, पाणी नागरिकांना पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्यच आहे परंतु कर्तृत्व करून दाखवायचे असेल तर अद्यावत हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था उभ्या कराव्या लागतील, मुस्लिम सेवा समितीने सुचविलेल्या विकास कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल असेही खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अल्पसंख्याक समाजाच्या विविध कामांसाठी लवकरच तालुकास्तरीय बैठक बोलावली जाईल असे आमदार अतुल बेनके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जुन्नर तालुका मुस्लिम समाज सेवा समितीच्यावतीने तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, एकात्मिक बालविकास अधिकारी हरिभाऊ हाके, उपविभागीय पोलिस अधिकारी दिपाली खन्ना यांना मान्यवरांच्या हस्ते ‘उत्कृष्ट प्रशासन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नारायणगाव कोविड सेंटरच्या आरोग्य कर्मचारी यांचाही यावेळी आरोग्य सुरक्षा किट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती सचिव मेहबूब काझी यांनी केले, सूत्रसंचालन सहसचिव अशफाक पटेल यांनी केले व आभार फकीर आतार यांनी मानले.

Previous articleआमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जीवाला तहसीलदार महिलेच्या पतीकडून धोका
Next articleआंबेगाव तालुक्यात वाळू माफियांचा नंगानाच ;दोन पत्रकारांना बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न