आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या जीवाला तहसीलदार महिलेच्या पतीकडून धोका

राजगुरुनगर : राजगुरुनगर तालुक्याचे तहसीलदार सुचित्रा आमले यांचे पती बाळासाहेब आमले गुंड प्रवृत्ती असल्याने आणि तहसीलदार यांचे पतीच्या जीवावर मनमानी वागत आहेत. त्यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असुन त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा प्रकारची तक्रारवजा मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रविवारी (दि ९) खेड पोलीस ठाण्यात समक्ष येऊन दाखल केली.

खेडच्या महिला तहसीलदार सुचित्रा आमले तहसीलदार म्हणून नेमणूक झाल्यावर तालुक्यातील अनेक गावात अवैध कामे राजरोसपणे करीत आहेत.जमिनीच्या नोंदी, दाखले,रेशनकार्ड आदींसाठी तलाठी, सर्कल यांच्या माध्यमातून नागरिकांची अडवणूक करून मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करीत आहेत. तहसीलदार यांच्या या मनमानी कारभाराबाबत अनेक गावातील सरपंच, प्रतिनिधी व नागरिकांनी तक्रारी केल्यावर लोकप्रतिनिधी या नात्याने आपण चौकशी सुरू केली असे आमदार मोहिते यांनी म्हटले आहे.

मात्र तहसीलदार यांचे पती बाळासाहेब आमले यांनी विरोधकांकडे माझ्या जीवाला धोका करण्याची भाषा वापरली. त्यांच्याशी माझा थेट संपर्क आलेला नाही.. मात्र हा माणूस गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास तहसीलदार सुचित्रा आमले व त्यांचे पती बाळासाहेब आमले यांना जबाबदार धरावे असेही आमदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले.

तक्रारीत आमदार मोहिते पाटील यांनी केलेले आरोप

१)तालुक्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीत अवैध वाळू उपसा

२)सरकारी गायरान व सेझ जागेत अवैध उत्खनन

३)कोरोनाच्या लॉकडाऊन काळात चाकण midc मध्ये तलाठी, सर्कलच्या माध्यमातून बेहिशेबी रक्कम गोळा केली.

३)कोरोनाच्या लॉकडाऊन काळात चाकण midc मध्ये तलाठी, सर्कलच्या माध्यमातून बेहिशेबी रक्कम गोळा केली

४)तहसीलदार आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मात्र

५)त्यांच्या कामचुकार पणामुळे तालुक्यातील रुग्णवाढ

६)गुळाणी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरण दाबले

७)पतीच्या माध्यमातून तहसीलदार यांनी तालुक्यातुन मोठी माया गोळा केली.कोरोना काळात एकही बैठक झाली नाही

८)पती बाळासाहेब आमले गुंडांशी संबंधित असुन माझा
घातपात करतील

Previous articleआँगस्ट क्रांती मैदानावर जावून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले अभिवादन
Next articleमुस्लिम समाजाची सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद-खासदार डॉ. अमोल कोल्हे