फिरते पशुचिकित्सालयाचा (मोबाईल व्हॅन) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

अमोल भोसले,पुणे

जिल्हा परिषद पुणे, पशुसंवर्धन विभाग मार्फत पुणे जिल्ह्यात फिरते २५ पशुचिकित्सालय (मोबाईल व्हॅन) पैकी दहाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजित पवार यांच्या शुभहस्ते पोलीस ग्राउंड, शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला. यावेळी अजित पवार यांनी नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत मदतीस पोहोचत असल्याने पुणे जिल्हा परिषदेचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व अर्थ समिती रणजीत शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, CEO-आयुष प्रसाद, Add ceo- भारत शेंडगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- डॉ.शिवाजी विधाटे इत्यादी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

पशुधन आजारी पडल्यास, अचानक विषबाधा झाल्यास किंवा एखादी आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होवू शकते किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पशुवैद्यकास घटनास्थळापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही अशा वेळेस सदरचे आजारी जनावर दवाखान्यापर्यंत उपचारासाठी घेवून येण्यासाठी पशुपालकांना मोठा आर्थिक भूदंड सोसावा लागतो. प्रसंगी वेळेत उपचाराअभावी जनावराचा मृत्यू होवून पशुपालकास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच पुणे जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम व डोंगराळ आहे सदरच्या भागात दळणवळणाच्या सुविधांचा अभाव असून पशुपालकांना दवाखान्यापर्यंत आणणे शक्य होत नाही. आपातकालीन प्रसंगी पशुवैद्यकार (डॉक्टर)त्याचेकडील दुचाकी वाहनाने पशुपालकापर्यंत पोहचावे लागते अशा प्रसंगी कित्येक पशुवैद्यकांचा गंभीर अपघात होवून दुखापत झालेली आहे. व काही पशुवैद्यकांना प्राण गमवावे लागलेले आहे. अशा दुर्गम व डोंगर भागातील पशुपालकांकडील पशुधनावर आवश्यक ते उपचार शस्त्रक्रिया वेळेवर व तातडीने करणेसाठी जनावराचा जीव वाचविणेसाठी वेळेत प्रयत्न करणे यासाठी फिरते पशुचिकित्सालयामुळे सहज शक्य होईल. पशुपालकांनी व शेतकरी बंधूनी टोल फ्री क्रमांक १९६२ वर कॉल करून या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती ही यावेळी केली.

मोबाईल व्हॅन सेवा प्रकार व प्राधान्य :

इमर्जन्सी- (तातडीच्या सेवा) अपघात, जाग्यावर पडणे,
कष्टमय प्रसूती, मायांग बाहेर पडणे.

विषबाधा सर्पदंश / केमिकल इ.

लक्षण सांगणारे आजार -दिवसभरात सेवा देता येणारे-
ताप , डायरीया , स्तनदाह ,कृ. रे ,जखम , वेदना , अपचन , दूध कमी.
नियोजन करून सेवा देणे-
गर्भ तपासणी, स्वास्थ दाखला , शस्त्र क्रिया, शवविच्छेदन , खच्चीकरण व फॉलो अप केसेस, जंतनाशके, लसीकरण इ. पोट फुग.

Previous articleघोडेगाव मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा
Next article“बाण” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते