प्रजासत्ताक दिनानिमित्त मेल्झेर कंपनीतील कामगार वर्गाकडून अनाथांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुरकुंभ- सुरेश बागल

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कुरकुंभ एम. आय. डी. सी .तील मेल्झेर कंपनीतील कामगार वर्गाकडून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील अनाथ मुलांची,सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळा येथे इंव्होटर,१०० पेन, थंडीपासून ऊब मिळावी म्हणून ७० ब्लॅंकेट,मुलांना खाऊ व किराणा
मटेरियल असे एकूण ५८ जणांनी व ३६,७६७ रुपये रक्कम गोळा करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.कुरकुंभ पासून घारगाव हे अंतर ५० की. आहे परंतू अंतर जास्त का असेना पण मदत ही गरजू व अनाथ मुलांसाठी झाली पाहिजे .असे कामगार वर्गाचे म्हणणे होते.

सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले माध्यमिक निवासी शाळेतील क्रांतिकारी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वरिष्ठ अधिकारी हनुमंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सामाजिक काम करणारी व्यक्ती भरपूर आहेत पण अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे असा कामगार वर्ग एकमेव आहे अनाथ व गरजू मुलांना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन त्यांच्या बरोबर वेळ घालवणे ही सगळ्यात मोठी बाब आहे.सामाजिक भान ठेवून समाजात राहून समाजासाठी आपण मोठे काम केले हे कौतुक करेल तेवढे कमीच आहे. कंपनीतील कामगार वर्गाने आणि आपण मेहनतीने आणि कष्टाने पैसे कमवून अनाथांना मदत केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले.
– सावित्रीबाई फुले प्राथमिक व महात्मा फुले,माध्यमिक निवासी शाळा (घारगाव,ता. श्रीगोंदा ) संस्थापक अध्यक्ष – पोपटराव खामकर

संस्थेचे अध्यक्ष पोपटराव खामकर आणि शिक्षक वर्ग यांच्याकडून कार्यक्रमाला कंपनीतील कामगार वर्ग स्टोर डिपार्टमेंट चे लक्ष्मण विंचूरकर, इलेक्ट्रिशन अशोक शिंदे,प्रोडक्शन प्लॅन्ट ऑपरेटर विश्वास सूर्यवंशी, महादेव रणसिंग, सुरेश बागल ,मेंटनन्स फिटर अनिल खोमणे, कोळगावचे राहुल तोंडे ,शिक्षक वर्ग, अनाथ मुले आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

पत्रकार सुरेश बागल यांच्या मित्रपरिवाराणे आणि कामगारवर्गाने कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे निवासी शाळेकडून पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन शिक्षकांकडून सत्कार करण्यात आला आहे. आणि मेल्झेर कंपनीतील कामगार ग्रुपला मा. पंचायत समिती सदस्य रघुनाथ(अण्णा) खामकर यांच्याकडून ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कंपनीतील मुख्य अधिकारी श्रीधर डोंगरे आणि प्रोडक्शन मॅनेजर हनुमंत बोकडे यांची मदत अनाथांच्या जीवनात उपयोगी ठरली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हनुमंत सुतार, अशोक शिंदे, अनिल खोमणे आणि कंपनीतील कामगारांनी मोठया प्रमाणात प्रयत्न केले.

शासनाचे अनुदान मिळणे गरजेचे आहे.या शाळेत आजपर्यंत हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे आहेत. या शाळेत १ ली ते १० वी पर्यंतचे वर्ग सुरू आहे. या शाळेत शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाते.आजही या शाळेत एकूण २६५ विद्यार्थी याचा लाभ घेत असून त्यांच्या शिक्षणासाठी प्रशिक्षित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचरार्यांची नियुक्ती केली आहे. कोरोना आजारामुळे सध्या ६ मुले आहेत थोडया दिवसात मुलांचे प्रमाण वाढले जाईल. या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांकडून कोणत्याही प्रकारची फी किंवा देणगी घेतली जात नसून त्यांना विनामूल्य विनामूल्य प्रवेश दिला जातो.

या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची मान्यता आहे . परंतू शासनाने कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. त्यासाठी संस्थेने गेले १८ वर्षांपासून स्वबळावर व सामाजिक मदतीतून
या मुलांची राहण्याची, जेवणाची,शिक्षण, आरोग्यइत्यादी सुविधा पुरवित आहे.
असे घारगाव निवासी शाळेतील संस्थेचे अध्यक्ष श्री.पोपटराव खामकर यांनी सांगितले .

Previous articleअभाविप’ने काढली जुन्नरमध्ये भव्य तिरंगा पदयात्रा
Next articleफोर्ट ऍडव्हेंचर ग्रुपची हरिश्चंद्र गडावरील शेंडी सुळक्यावरून राष्ट्र ध्वजाला मानवंदना