सर्वसामान्य जनतेची हक्काची लाल परी निघाली ; रोटरी क्लब च्या वतीने वाहक व चालक यांचा सन्मान

 

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

राज्यभरात कोरोनाचा फैलाव वाढत असताना या आजाराचा प्रादुर्भावामुळे रोगाचे प्रसारण रोखण्यासाठी गेले तीन महीन्या पासून सार्वजनिक वाहतुक बंद करण्यात आली होती. कोरोनाचे सावट गेले नसले तरी काही प्रमाणात दैनंदिन जीवनमान सुरळीत सुरू झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले बस सेवेमुळे मंचर बस स्थानकामध्ये शुकशुकाट होता मात्र तिन महिन्यांच्या दिर्घ विश्रांतीनंतर मंचर बस स्थानकावरून दि १४ रोजी पहिली एस टी बस मंचर-कळंब-चास- घोडेगाव या मार्गाने सुरू झाली असल्याने सर्वसामान्य जनतेची लाल परी पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.जेष्ठ नागरिक व लहान मुलांना रोग प्रतीकारक क्षमतेच्या कारणाने त्यांना प्रवासास परवानगी नाही.मात्र इतर नागरिक नियमांचे पालन करून प्रवास करू शकतात असे एस.टी.महामंडळ यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी रोटरी कल्बचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांनी एस टी बसला हार घालून, चालक, वाहक यांना रोटरी क्लब मंचरच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. चालक, वाहक, नियंत्रक, अधिकारी व प्रवाशांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी एस टी महामंडळातील कर्मचारी, अधिकारी, गौरव काळे(सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक) महेश विटे(सहाय्यक वाहतूक निरीक्षक) मोहमद सय्यद(वाहतूक नियंत्रक) अजयशेठ घुले, तुषार कराळे,सागर काजळे अमोल शिंदे, पप्पूशेठ थोरात, दिपकशेठ चवरे व इतर उपस्थित होते.

Previous articleएस. एम. देशमुख यांची राज्यपालांनी विधान परिषदेवर पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय मिळवून द्यावा
Next articleदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यावर मंचर पोलिसांची कारवाई