जुन्नर तालुक्यात ५०८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३६५ रुग्ण बरे होऊन घरी,दोन मृत्यू

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार यांचे कोरोना मुळे आज सकाळी दहा वाजता निधन झाले.

जुन्नर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५०८ एवढी वाढली असताना आज पर्यंत ३६५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही दिलासादायक बातमी आहे. मात्र पारुंडे येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार तसेच बेल्हे येथील एका रुग्णाचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
दरम्यान आज तालुक्यामध्ये केवळ ६ पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

आजपर्यंत जुन्नर तालुक्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांंची संख्या ५०८ एवढी झाली असून आजपर्यंत २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यापैकी ३६५  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ११९ एवढी आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज बेल्हे व पारुंडे येथे प्रत्येकी एक असे २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन असून गुंजाळवाडी, तेजेवाडी व वडगाव कांदळी येथे प्रत्येकी एक व जुन्नर येथे तीन असे आज एकूण ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान सर्वांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहे. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने वारंवार केले जात आहे.

Previous articleदौंडकराना दिलासा कोरोना निगेटिव्ह चे वाढले प्रमाण
Next articleग्रामसंसद ही वास्तू गावाच्या वैभवात भर टाकणारी – खासदार डॉ अमोल कोल्हे