मुलाच्या वाढदिवसासाठी चाललेल्या वडिलांचा अपघातात मृत्यू

मंचर  – मुलाच्या पहिल्याच वाढदिवसासाठी सासरी चाललेल्या वडिलांचा पुणे नाशिक हायवेवर एकलहरे गावचे हद्दीत डिव्हायडरला धडकून अपघात होऊन मृत्यू झाल्याची दुःखद घटना ( दि.१८) रोजी रात्री घडली आहे. याबाबतची फिर्याद मनोज सतीश थिटे ( वय २२ रा.पिंपरी पेंढार , ता. जुन्नर जि. पुणे ) दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे फिर्यादीच्या घरी अमृत संजय इगवले (वय ३५ रा.दिडघर नसरापूर ता.भोर जि.पुणे ) यांचा मुलगा व पत्नी राहत होते. मुलगा वेदांत याचा वाढदिवस असल्याने अमृत इगवले हे ते वापरत असलेली गाडी सी डी डीलक्स एम.एच.१४ सी.आर.७५७९ या गाडी वरून नसरापुर येथून पिंपरी पेंढार या ठिकाणी येत असताना पुणे नाशिक हायवे वर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे आले असता नवीन बायपास रोड वर डीवाईडर ला जोरदार धडक बसून त्यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी हे मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबत नंतर पोलिसांना माहिती करतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अपघाताची माहिती कुटूंबियाना दिली आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.

Previous articleस्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परतताना मुलीचा अपघातात मृत्यू ; अवघ्या गावावर शोककळा
Next articleउरुळी कांचन विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजाराम कांचन तर उपाध्यक्षपदी संभाजी कांचन यांची निवड