दौंडकराना दिलासा कोरोना निगेटिव्ह चे वाढले प्रमाण

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

दौंड ग्रामीण व शहरात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे, निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे दौंडकराना दिलासा मिळत आहे,उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 7/8/20 रोजी दौंड शहरातील एकूण 29 जणांचे swab तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यांचे रिपोर्ट आज दिनांक 8/8/20 रोजी प्राप्त झाले त्यापैकी एकूण 2 व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटिव्ह आले तर 27 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, यामध्ये एक महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे. हे रुग्ण शिवाजी चौक -1,सरस्वती नगर-1येथील असून 30 ते 78 वयोगटातील आहेत अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय दौंड चे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली.

ग्रामीण भागातही 50 नागरिकांचे रिपोर्ट तपासणी साठी नेले आसता त्यातील 46 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 4 रिपोर्ट पॉजीटिव्ह आले आहेत, एकेरीवाडी-2-यातील 18 वर्षीय एक तरुण तर 35 वर्षीय एक महिला आहे, कुरकुंभ येथे-2-यातील 43 वर्षीय एक पुरुष तर 36 वर्षीय एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावात आरोग्य अधिकारी,कर्मचारी, पोलीस, प्रशासनाने केलेले प्रयत्न व नागरिकांनी घेतलेली खबरदारी यामुळे कोरोना चा प्रभाव कमी होत आहे, ही लढाई जिंकत आलेली असताना,नागरिकांनी अजून थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे, योग्य ती काळजी घेणे सुरू ठेवल्यास लवकरच आपण कोरोना कायमस्वरूपी संपुष्टात आणू शकतो,यावर एकच उपाय घरी रहा,सुरक्षित रहा.

Previous articleनारायणगाव येथे शिवनेरी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्रास मान्यता
Next articleजुन्नर तालुक्यात ५०८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३६५ रुग्ण बरे होऊन घरी,दोन मृत्यू