रिलायन्स कंपनी कडून पाटस ग्रामपंचायतीला बल्ब व प्रकाश साहित्य भेट

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस गावातील ग्रामपंचायतीच्या मागणीवरून रिलायन्स कंपनीच्या वतीने सीएसआर फंडातून पाचशे बल्ब व प्रकाश व्यवस्थेसाठी साहित्य ग्रामपंचायत कसबे पाटस यांना उपलब्ध करून देण्यात आले.

रिलायन्स कंपनीतील बेटकेकर साहेब, प्रभाकर पाटील योगेश बंदिष्टी यांनी हे बल्ब उपलब्ध करून दिले. यामुळे गावातील प्रकाशव्यवस्था सुधारण्यास मदत होईल .

यासाठी तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात व सदस्य जिल्हा नियोजन समिती सत्वशील भाऊ शितोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.हे सर्व ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामपंचायत सरपंच अवंतिका ताई शितोळे उपसरपंच छगन तात्या मस्के व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारण्यात आले.

Previous articleहवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड
Next articleकिमान पेंशन ५ हजार करा भारतीय मजदूर संघाची केंद्र सरकार कडे मागणी ; अन्यथा देशव्यापी आंदोलन