हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी चंद्रकांत वारघडे यांची निवड

अमोल‌ भोसले,उरुळी कांचन

हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यांना जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी निवडीचे पत्र देण्यात आले.

शिरुर हवेली आमदार अशोक पवार, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केलेल्या शिफारशीमुळे तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने या निवडी होत असतात. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी हवेली हे अध्यक्ष असतात व सदस्य म्हणून पोलिस उपअधीक्षक पुणे ग्रामीण, उपअभियंता पाटबंधारे विभाग, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, हवेली सहाय्यक उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली, त्याप्रमाणे अशासकीय सदस्यामध्ये बकोरी येथील माहिती सेवा समितीचे अध्यक्ष वृक्षप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे, संजय प्रभु चव्हाण, अमोल शिवाजी चव्हाण, उरुळी कांचन येथील माजी उपसरपंच रामदास तुपे, पेठ गावचे सरपंच सुरज चौधरी, माणिक सुपणार यांची निवड करण्यात आली.

दर तीन महिन्यांत याची बैठक होत असते.
आमदार अशोक पवार यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांना अपेक्षित प्रमाणे काम केले जाईल असे नवनियुक्त सदस्य चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.

Previous articleरोटरी क्लब हायवे तर्फे शिक्षकांचा बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन गुणगौरव
Next articleरिलायन्स कंपनी कडून पाटस ग्रामपंचायतीला बल्ब व प्रकाश साहित्य भेट