वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या न सुटल्यास राज्य व्यापी आंदोलन छेडणार

कुरकुंभ,सुरेश बागल

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न (भारतीय मजदूर संघ) केंद्रीय व जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची मिटिंग रविवारी ९ जानेवारीस पुण्यात संपन्न झाली.

महा विकास आघाडी सरकार स्थापने पासून ४५,०००वीज कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कामगारांच्या समस्या वाढल्या असून या समस्या दूर होई पर्यंत आंदोलन चालू ठेवण्याची भूमिका संघटना घेईल. कंपनीचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनावर संगनमताने डल्ला मारणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतले पाहिजे, कंत्राटदारांवर वरदहस्त न ठेवता त्यांना दंड केला पाहिजे या भूमिका महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.
या मिटिंग साठी मा.अण्णाजी देसाई प्रमुख मार्गदर्शक होते. न्याय मिळेपर्यंत लढा देण्याची तयारी कामगारांनी करावी असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र विज कामगार महासंघाचे संघटन मंत्री विजय हिंगमीरे यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्यां सोडवण्यासाठी कामगार महासंघ सक्रिय सोबत असेल असे आश्वासन दिले.

सर्व जिल्ह्याला बँक खाते काढून संघटना आर्थिक रित्या मजबूत करणार असून न्यायदेवते कडून कामगारांना न्याय मिळवून देऊ असे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे कोशाध्यक्ष सागर पवार म्हणाले. संघटनेचे विक्त मंत्री श्री धनंजय इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, व संघटन मंत्री राहुल बोडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांनी एकजुटीने महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या सोबत उभे राहून अन्याय विरूध्द संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे.
कोविडचा प्रादुर्भाव पहाता सर्व निकष पाळून , प्रातानिधीक स्वरूपात बैठक संपन्न झाली .

Previous articleखतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषीमंत्री दादाजी भुसे यांची मागणी
Next articleदौंड शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी मेळावा संपन्न