प्राथमिक शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या होणार

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

covid-19 कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता, शिक्षकांच्या बदल्या करण्यात काही अडचणी येवू शकतात म्हणून या कालावधीमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या फक्त विनंती व समायोजन बदल्या करण्यात याव्यात व प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती .शासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्राथमिक शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या करण्यात याव्यात याबाबतचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना निर्गमित केले आहेत .अशी माहिती गौतम कांबळे राज्य महासचिव यांनी दिली.

याबद्दल महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीने राज्य सरकारचे आभार मानले आहेत . याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री ,ग्राम विकास मंत्री ,शालेय शिक्षणमंत्री व आमदार राहुलदादा कुल यांना देण्यात आले होते .याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ प्रणित शिक्षक आघाडीचे राज्य महासचिव गौतम कांबळे यांनी दिली .यावेळी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती वाघमारे व उपाध्यक्ष जयवंत पवार हे उपस्थित होते .