अष्टापूर येथे जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन

अमोल भोसले,उरुळी कांचन

गावाच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाबरुन न जाता प्रशासनाला मदत सहकार्य करावे. सर्वानी योग्य काळजी घ्यावी असे मत जिल्हा परिषदेच्या सदस्या कल्पना जगताप यांनी व्यक्त केले. अष्टापुर ग्रामपंचायत (ता.हवेली) येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या कल्पना सुभाष जगताप यांच्या फंडातून करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्गखोल्या दुरुस्तीसाठी व अंगणवाडीसाठी वर्गखोली असे विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप, अष्टापुरच्या सरपंच कविता योगेश जगताप, उपसरपंच सुभाष बारीकराव कोतवाल, मा उपसरपंच कालिदास संभाजी कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, संजय कोतवाल, अलका कोतवाल, सुरेश कोतवाल, आबासाहेब कोतवाल, तयाजी जगताप, युवा नेते योगेश जगताप, किरण कोतवाल, शिवाजी कोतवाल, अभिमान कोतवाल, महेश ढवळे, नवनाथ कोतवाल, गणेश कोतवाल, मयूर कोतवाल, सचिन माकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleशिष्यवृत्ती परीक्षेत सायली शिंदे दौंड तालुक्यात प्रथम
Next articleवाहतुकीची घनता लक्षात घेऊन सय्यदनगर येथील रेल्वे फाटक वाहतुकीसाठी खुले करा: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी