शिष्यवृत्ती परीक्षेत सायली शिंदे दौंड तालुक्यात प्रथम

दिनेश पवार:दौंड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळद ,केंद्र – कुरकुंभ या शाळेतील विद्यार्थिनी सायली दत्तात्रय शिंदे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत 244 गुण मिळवून दौंड तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच यावर्षी सायली शिंदेची निवड नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे झाली आहे .

सायली हिने 244 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीधारक बनली आहे .तिला वर्गशिक्षक गलांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मणियार सर ,केंद्रप्रमुख गोरे साहेब, शिक्षणविस्ताराधिकारी दिलीप वनवे साहेब व गटशिक्षणाधिकारी नवनाथ वनवे साहेब यांनी तिचे अभिनंदन केले या यशाबद्दल सायली चे परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे

Previous articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदरे यांची निवड
Next articleअष्टापूर येथे जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन