आकाश भोकसे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड

चाकण- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची कार्यकारणी आज जाहिर करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते महाराष्ट्र राज्याची युवा‌ कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

कुरकुंडी गावचे युवासेना उपाध्यक्ष कु. आकाश मारुती भोकसे यांची महाराष्ट्र राज्य युवा कार्यकारणीच्या उपाध्यक्ष पदी सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.दिपक भवर सर यांनी दिली.

संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारणीने माझ्यावर विश्वास दाखवला व माझ्यावर नव्याने दिलेली जबाबदारी यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी दिलेली जबाबदारी निश्चितपणाने पार पाडुन माझ्या पदाला शोभेल असे काम नक्की करुन दाखवीन. त्याप्रमाणे टाकलेला विश्वास कधीच वाया जाऊ देणार नसल्याचे आकाश भोकसे यांनी सांगितले.

Previous articleहिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय (भाई) देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
Next articleपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदरे यांची निवड