माहिती सेवाभावी संस्था पुणे जिल्हा संघटक पदी सदाशिव रणदिवे यांची निवड

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

माहिती सेवाभावी संस्था , महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपजी लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सदाशिव पोपट रणदिवे सर यांची माहिती सेवाभावी संस्था पुणे जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली. तर पत्रकार मा.श्री शिवकुमार कांबळे यांची दौंड तालुका संघटक पदी निवड करण्यात आली नियुक्ती पत्र माहिती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष – विनायकदादा दोरगे यांच्या हस्ते देण्यात आले. माहिती सेवाभावी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवून त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम करीत आहे, मेजर संदीप जी लगड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेचे कार्य चालते .

यावेळी संस्थेचे पदाधिकारी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष – राहुलकुमार अवचर, पुणे जिल्हा प्रवक्ते – रमेश मलभारे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख- विजयजी कदम. आरपीआय दौंड तालुका उपाध्यक्ष – अनिलजी गायकवाड माहिती सेवाभावी संस्था दौंड तालुका युवक उपाध्यक्ष सुधीर दोरगे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप दोरगे , दत्तात्रय जाधव आदि मान्यवर उपस्थित होते