दौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

दिनेश पवार,दौंड

अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुका आणि शिव स्मारक समिती दौंड यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक दौंड येथे साजरी करून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला,
या कार्यक्रमा निमित्त समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.संगीता वीरधवल जगदाळे यांनी भूषविले, यावेळी नगराध्यक्षा शितलताई कटारिया, नगरसेविका अरुणा डहाळे,पुनम पडवळकर, लीला कवडे,अर्चना पवार,दत्ताजी शिनोलीकर, हरिश्‍चंद्र ठोंबरे, राजन खट्टी, अनिल तात्या सोनवणे,सचिन कुलथे, निखील स्वामी, रामेश्वर मंत्री, नंदू नाना जगताप, उमेश वीर, प्रमोद खांगल, अविनाश गाठे, शैलेश पवार, आदिनाथ थोरात, सोमनाथ लवंगे,अशोक जगदाळे, मनोहर बोडके, अक्तर काजी, प्रकाश सोनवणे, वैभव जठार, रवी पवार ,आबा फराटे, अनिल कवडे, गणेश काकडे, महेंद्र देसाई, उमेश जगदाळे, विकास जगदाळे, प्रताप खानविलकर, संदीप बारटक्के, सचिन पवळ, अमोल जगताप,संदीप शेलार संदीप मांडे,वाघ,गणेश घोलप,शंतनु निंबाळकर, रवि बंड,महादेव कवडे, सज्जन काकडे, शैलेश पिल्ले, नाना ताटे, अनंत जोगळेकर संदीप कोळेकर, धनंजय ताटे तसेच अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी सिमा डोंगरे,सुनिता कुंभार,जयश्री चुंबळकर,रेखा सदाखळे,नंदा मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठाणच्या वतीने शिवदर्शिका 2022 प्रकाशित करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवती आघाडीच्या आदिती थोरात,शिवानी गायकवाड,अक्षता पवार, अनुंष्का पवार यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संपदा दुधाट यांनी केले तर आभार प्रसाद गायकवाड यांनी मानले.

Previous articleनारायणगांव येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
Next articleदौंड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी