पुणे जिल्हा बालकामगार सल्लागार अशासकीय समितीवर प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

१० वर्षावरील बालकामगारांवर होणारे अन्याय, कमी वयोगटातील मुलांना शिक्षणापासुन वंचित ठेवुन हाॕटेल, कंपनी, कारखाने दुकाने अशा उद्योगधंद्यामध्ये बालकामगार मजबुरीने, जबरदस्तीने कामावर पाठवत असतात. कमी वयोगटातील कामगार हे कोणत्याही क्षेत्रात किंवा व्यवसायात आढळुन आल्यास कायदेशीर कारवाई बालकामगार समिती मार्फत केली जाणार असे मनोगत प्रा.सुरेश वाळेकर यांनी बालकामगार समिती सदस्य म्हणुन व्यक्त केले.

सदर समितीवर नव्याने निवड करण्यासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॕंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुका राष्ट्रवादी काॕंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रा.सुरेश वाळेकर यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पञ जिल्हाधिकारी डाॕ.राजेश देशमुख यांनी दिले. यापुढे बालकामगारांच्या समस्या, शासकीय विविध योजना यांसंदर्भात शासन दरबारी योग्य न्याय मिळवुन देण्याचे काम प्रा.सुरेश वाळेकर करणार आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

Previous articleउंडवडी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
Next articleघरकुलांच्या लाभार्थींना सरपंच धनश्री पवळे यांच्या हस्ते वर्क ऑर्डरचे वाटप