सहजपूर येथे आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

योगेश राऊत ,पाटस

यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे लगत सहजपूर गावच्या हद्दीत एका 35 ते 40 वर्षीय तरुणाचा डोक्यात कोणत्या तरी हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

सदर तरुणाचा खून त्याठिकाणी झाला का दुसरीकडून मारून आणून टाकले याचा तपास चालू आहे, सदर तरुणाचे वय अंदाजे 35 ते 40 असून त्याच्या डोक्याचे केस काळे आहेत, दाढी-मिशा काळया पांढर्‍या असून वाढलेल्या आहेत, अंगामध्ये तपकिरी व पिवळ्या रंगाचा चौकटी फुल बाहयाचा शर्ट घातलेला आहे, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असून, राखाडी रंगाची अंडरवेअर आहे त्यावर पांढर्‍या रेषा आहेत, मयताच्या जवळच गुलाबी रंगाचा टॉवेल आणि काळ्या रंगाच्या चपला पडलेल्या आहेत, अशा वर्णनाच्या इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणासाठी, कोणत्या तरी हत्याराने डोक्यात वार करून खून केलेला आहे सदर तरुणास कोणी ओळखत असल्यास यवत पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यवत पोलीस स्टेशन फोन नंबर–02119/ 274233, पोलीस निरीक्षक नारायण पवार मो न– 9763523849, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे 9011127770, पोलीस नाईक अजित काळे 9850076891, पोलीस नाईक प्रमोद गायकवाड 9545878798 वरील पोलिस अधिकाऱ्यांच्या नंबर वर संपर्क साधून सदर मयत याची ओळख पटविण्यासाठी जनतेला आव्हान करण्यात आले आहे, यामध्ये मयत इसमाची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देण्यात येईल तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पो नि नारायण पवार यांनी सांगितले आहे,अज्ञात खुण्याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 30/2022 भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार पुढील तपास करीत आहेत.

Previous articleखंडणीप्रकरणी तिघांना अटक
Next articleमराठा महासंघाच्या हवेली ता.उपाध्यक्षपदी अतुल मोरे यांची निवड